कधी कधी वर्गामध्ये रडविते,
पण आपली पाठ कधीच सोडत नाही,
अशी असते आपली शाळा,
तिच्या मुळे जगणे सापडते,
गावाच्या मातीचा, मनाला भासणारा सुगंध
आपल्या आयुष्याचे पहिले पाढे वाचत असतो,
आपल्याला सहन करणार्या सर्व शिक्षकांचा आपल्या जडण घडणीत मोलाचा वाटा असतो,
घराच्या भिंतीना ओल्या मातीचा गंध,
जस तना मनामध्ये ध्येय गाठण्याचा छंद
मन मारुन जगणे, मनाला ही स्थिर ठेवते,
जगण्याची एक तरी कला आपल्याल्या यातुनच मिळते ,
आपल घर आजी - आजोबानी कष्टान उभारल ,
ते आई वडीलानी सावरल, आपल्याला पण खरंच आयुष्य सावरायला घरानंच शिकवल
अशा या मातीच्या घरांशी एक निष्ठ रहावे लागते,
तसे हे जगण्याचं गुपीत सांगत राहील...!
🖋🖋🖋🖊📗📗🎖🎖🎖🥇🙂🙂