या गावातील सदु नांवाचा एक शेतकरी देवाला मानीत असे. तो एके दिवशी झोपडीतुन उठला नि शेतात गेला. जमिनीला अनेक ठिकाणी तडे पडले होते.
सदुला ते बघवेनात. तो रडू लागला.वरुणाला आळवू लागला. झाडे तोडू लागला.
याच समयी एक काळा मेघ नेमका डोईवर होता. पवनदेवांनी सदूची करुणा या ढगांला पोचविली.
मेघ हा अनेक जलबिंदुचा समुदाय असतो. या समुदायातील एका थेंबाला सदूची करुणा ऐकून पाझर फुटला तो चिमुकला , साथीदार थेबांना बोलला, "चला रे ! या गरीबाच्या शेतावर आपण सारे एकसाथ तुटून पडु शेत भिजेल. शेतकरी आनंदेल. पीक पिकेल . आपलं बलिदान कामी पडेल. चला रे चला! "
इतके बोलून या थेंबाने पुढाकार घेतला. आकाशातून सरळ तो सदुच्या नाकावर आदळलो गरीब शेतकरी अति आनंदित झाला. नाकावरील थेंबाचे मनापासूनन अभिनंदन केले.
एकाचे बघुन मेघा तले सारे थेंब धरणीवर पडू लागले. एका बरोबर अनेक मेघ गोळा झाले आणि लवकरच अवनीची तहान शमली .तडे पडलेली जमीन जोडली गेली.
कोरडी भुमि हरित भुमि झाली.जिकडे -तिकडे आंनदी आनंद झाला.
या आंनदाला कारणीभुत कोण? एक चिमुकला जल बिंदू! साथीदार थेंबांची एकी!!
लहानांची एकी नेहमी असेच महान काम करते. रुप लहान असेल तरी काम महान असते.
बोध : लहान माणसाला कधीही कमजोर समजू नये...!!! 🙂🙂🙏🙏