हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बर्याचदा तारकाकृती असतात.तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो.
दगडांमध्येच एकमेकांत घटट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर , हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात.... !