जिंजीचा किल्ला सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना तो जिंकून घेतला. हा किल्ला मूळचचा दुर्गम होता. तरी देखील महाराजांनी त्याच्ये आधीचे तट पाडले आणि नवे तट व बुरूज बांधून तो अधिक मजबूत बनवला. किल्ल्ये दुर्गम कसे बनवावेत, याचे शिक्षण शहाजीराजांनी त्यानां लहानपणीच दिले होते. शिवाजी महाराजांनी त्या ज्ञानाचा उपयोग या प्रसंगी केला, असे दिसते. पुढे राजाराम महाराजांनी या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापना केली. ते त्या किल्ल्यावर असतात मुघलांनी त्याला वेढा दिला. परंतु राजाराम महाराजांनी त्या वेढ्यात अडकूनही सुमारे सात वर्षेपर्यंत किल्ला लढवला शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा किल्ला अधिक मजबूत केलेला असल्यामुळेच राजाराम महाराज इतका काळ या किल्ल्यावर सुरक्षित राहू शकले....!